Home » जळगाव » जळगाव मनपात चालले दिवसभर ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे जबाब !

जळगाव मनपात चालले दिवसभर ‘त्या’ कर्मचाऱ्यांचे  जबाब !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव मनपातील निलंबित मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्या प्रकरणात बुधवारी पीडित महिलेवर दबाव टाकणारे आणि दवाखाना विभागातील कर्मचाऱ्यांची विशाखा समितीकडून चौकशी करण्यात आली. यात अनेक जणांचे जबाब नोंदविण्यात आले. सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दुसरीकडे घोलप यांनी आरोपांचे खंडन करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आयुक्तांनी मात्र सर्वांचीच चौकशी करण्याचे आदेश समितीला दिलेले आहेत.

समितीने दवाखाना विभागातील १९ जणांना चौकशीस हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यात दबाव टाकणारे सहा जण आहेत. अध्यक्षा तथा उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या दालनात बुधवारी दिवसभर चौकशी सुरू होती, त्यात जबाब नोंदवून घेतले जात होते. यातील तपशील अधिकृत समजू शकला नसला तरी काही जणांनी घोलप यांच्या बाजूने, तर काहींनी विरोधात जबाब दिल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तक्रार मागे घ्यावी म्हणून समिती 3 सदस्यांसह दवाखाना विभागातील सहा कर्मचाऱ्यांनी घरी येऊन, तर कोणी कामाच्या ठिकाणी धमकावले व तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे पीडितेने समितीकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *