Home » ताज्या » बापरे : पत्नी सासू-सासरे व मेहुणीने जावयाला केली जबर मारहाण !

बापरे : पत्नी सासू-सासरे व मेहुणीने जावयाला केली जबर मारहाण !

पाचोरा : प्रतिनिधी

शहरातील बाबा नगर भागात मध्यरात्री घरात घुसून पत्नीसह सासू-सासऱ्याने व मेहुणीने जावयाला मारहाण केल्याची घटना घडली असून पतीच्या फिर्यादीवरून पत्नी सासू-सासरे व मेहुणीविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, आकाश चव्हाण (३०) हे पत्नीसह घरी असताना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास सासू-सासरे व मेहुणी आदी लोक घरी आले. यावेळी पत्नी निशा हिने पतीला सांगितले की, माझे आई-वडील व बहीण बाहेर आले आहेत. दरवाजा उघडून पती बाहेर येताच सासू राधाबाई भगुरे हिने जावयाला खाली पाडले. सासरे रवींद्र यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मेहुणी दीपाली धोंडे हिने देखील मारहाण केली. यावेळी पत्नी निशा हिने सुरीने पतीच्या हातावर वार केला.

सासू-सासरे आकाश याचा लहान मुलगा घेऊन पत्नी निशा हिच्यासह मध्यरात्रीच निघून गेले. आकाश चव्हाण याने याबाबत पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *