November 7, 2026 4:36 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठा निर्णय : अग्निवीरांची संख्या वाढणार !

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मोठा निर्णय : अग्निवीरांची संख्या वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमी, नौदल आणि हवाई दल अग्निपथ योजनेचा आढावा घेत असून सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

भारतीय लष्करामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सामील होण्यासाठी तसेच त्यांना लष्करात दाखल होण्याची संधी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या तरुणांची निवड होते त्यांना अग्निवीर म्हटले जाते. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये ४ वर्षांसाठी भरती करण्यात येते. त्यांची ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवण्यात येते.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबविले. या अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करुन ते उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आता सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

मिळालेल्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान अग्निवीरांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी २०२६ च्या अखेरीस तयार होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सैन्य दलात अग्निवीरांची संख्या २५ टक्क्यांनी वाढविण्यावर विचार सुरु आहे. इन्फट्री आणि इतर सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या ७० ते ७५ टक्के, हवाई संरक्षण, सिग्नल, अभियंते आदी ८० टक्के आणि स्पेशल फोर्सेसमध्ये अग्निवीरांची संख्या १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर चर्चा सुरू असल्याचे समजते. अग्निवीरांचे सरासरी वय अधिक वाढवले जाऊ नये याचीही काळजी घेतली जाणार आहे. अग्निवीर भरतीसाठी वयोमर्यादा १७.५ वर्षे ते २१ वर्षे अशी आहे.

एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी म्हटले होते की अग्निवीर भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळात आहे. त्यांची संख्या २५ टक्के वाढवली जाऊ शकते. विशेष म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, तिन्ही सैन्य दलांमध्ये अग्निवीरांचे महत्त्व वाढले आहे. यामुळे त्यांची संख्यादेखील वाढवली जाऊ शकते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!