जळगाव : प्रतिनिधी
कंपनीतून कॉपरच्या पदूया चोरणाऱ्या ओम रामेश्वर पोपटकर (वय २०, रा. वाघनगर), रोहीत उर्फ रोहन भिकन मराठे ओम रामेश्वर पोपटकर (वय २२, रा. कासमवाडी) व सागर धर्मेंद्र सपकाळे ओम रामेश्वर पोपटकर (वय १९, रा. वाघनगर) या तिघांच्या एलसीबीने मुसक्या अवळल्या. शहरातील एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीज कंपनीतून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ४० हजारांच्या कॉपर पट्टी चोरुन नेल्या होत्या.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीतील उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेका विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहूल रगडे, उदय कापडणे, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर यांच्या पथकाने संशयित ओम पोपटकर, सागर सपकाळे व रोहीत मराठे या तिघांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.



