November 12, 2026 5:44 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » राज्यातील माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी !

राज्यातील माजी मंत्री थोरात यांना जीवे मारण्याची धमकी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे यांनी ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ अशी धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संगमनेरमधील घुलेवाडी येथे कीर्तन सुरू असताना कीर्तनकार भंडारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाबद्दल बोलायला सुरुवात केली. भंडारे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या मांडणीवर उपस्थित काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवला. समोर बसलेल्या काही लोकांनी कीर्तनकारांशी हुज्जत घातली. यावेळी कीर्तनस्थळी मोठा गोंधळ उडाला होता.

कीर्तनकार भंडारे यांना रोखल्याच्या निषेधार्थ भाजप आणि शिवसेनेने धर्माच्या नावावर मोर्चा काढला. यानंतर सोमवारी रात्री हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी व्हिडिओद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असे म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना थेट मारण्याची धमकी दिली. संग्राम भंडारे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.

दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी मात्र कीर्तनकार राजकीय भाषण करत असल्याचे म्हटले. सर्वांना शांततेचे आवाहन करून धर्मपीठाचे पावित्र्य राखावे. कीर्तनकार व समाजप्रबोधकांनी थोर संतांची परंपरा जपताना मानवतेचा धर्म पुढे न्यावा याचबरोबर संगमनेरची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्याचे आवाहनही थोरात यांनी केले होते.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!