Home » राष्ट्रीय » २१ महिला कर्मचारीचे ‘लाडक्या बहिण’ योजनेत समावेश !

२१ महिला कर्मचारीचे ‘लाडक्या बहिण’ योजनेत समावेश !

जळगाव : प्रतिनिधी

राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. महिला व बालविकास विभागाने अशा १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी यासंदर्भात परिपत्रक काढले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जळगावमधील ७, नंदुरबारमधील गील ८ आणि धुळ्यातील ६ महिला कर्मचाऱ्यांवर ‘महाराष्ट्र नागरी सेवा’ नियमांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांना महिना १,५०० रुपये दिले जातात. सरकारने या योजनेत पात्र ठरण्यासाठी निकष निश्चित केले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या या योजनेत पडताळणीवर अधिक भर देण्यात न आल्याने निकषात न बसणाऱ्या अनेकांनी योजनेचा लाभघेतल्याचे आढळून आले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त माहितीत आढळले. त्यात खान्देशातील २१ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.

महिला बालविकास विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेली ही यादी तात्काळ ग्रामविकास विभागाला पाठवून दिली आहे. ग्रामविकास विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या अपात्र लाभार्थी कर्मचाऱ्यांच्या यादीत एकनाथ चुडामण कोळी या कर्मचाऱ्याच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. लाडक्या बहिणींमध्ये या भावाच्या घुसखोरीविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *