Home » राष्ट्रीय » उद्धव ठाकरेंनी घेतले ‘शिवतीर्था’वर बाप्पाचे दर्शन !

उद्धव ठाकरेंनी घेतले ‘शिवतीर्था’वर बाप्पाचे दर्शन !

मुंबई : वृत्तसंस्था

तब्बल 20 वर्षानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र राजकीय मंचावर एकत्र आल्याने या भेटीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर आता गणेशोत्सवाच्यानिमित्ताने दोघेही बंधु पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सह कुटुंब दाखल झाले आहेत.

उद्धव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे शिवतीर्थावर आले. यावेळी माहिमचे आमदार महेश सावंत यांच्यासह शिवसेना ठाकरे गट, मनसेचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे एकत्र जेवणही करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करुन गणपतीसाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारुन उद्धव ठाकरे हे आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले आहेत. यापूर्वी 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. तर उद्धव ठाकरे देखील पहिल्यांदाच शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले आहेत. ठाकरे बंधुच्या या मनोमिलनामुळे कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *