जळगाव : प्रतिनिधी
शहरात मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास टिळक नगरातून पायी चाललेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, शारदा अर्जुनराव जाधव (वय ७६, रा. मयूरेश्वर कॉलनी, जळगाव) या वृद्ध महिला आपल्या मैत्रिणीसोबत टिळक नगरातील मंदिरातून घरी परत जात होत्या. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले. अचानक झालेल्या या हल्ल्याने गोंधळलेल्या महिलेने आरडाओरड केली; पण तोपर्यंत चोरटे पळून गेले. शारदा जाधव यांनी बुधवारी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.



