Home » राष्ट्रीय » जिल्हा नियोजन समिती बैठकीत पत्रकारांना प्रवेशबंदी ; उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाचा उल्लेख

जिल्हा नियोजन समिती बैठकीत पत्रकारांना प्रवेशबंदी ; उपमुख्यमंत्री पवारांच्या आदेशाचा उल्लेख

जळगाव : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षापासून नेहमीच जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश दिला जात असतो. मात्र गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत असल्याने आज जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी पत्रकारांना प्रवेशबंदीचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते, ठेकेदार, तसेच राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया हँडलर्स यांना मात्र परवानगी देण्यात आली.

पत्रकारांना बैठकीत परवानगी का दिली नाही, याबाबत विचारले असता प्रशासनाने सांगितले की हा निर्णय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार घेतला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. स्थानिक पत्रकार या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, पारदर्शकतेवर गदा येत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *