Home » जळगाव » चाळीसगाव » १७ वर्षीय तरुणीला पळविले : पोलिसांनी बारामतीतून केली तरुणाला अटक !

१७ वर्षीय तरुणीला पळविले : पोलिसांनी बारामतीतून केली तरुणाला अटक !

चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून – नेणाऱ्या तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी शिताफीने तपास करून बारामती येथून अटक केली. मुलीस पळवून नेणाऱ्या तरुणाचा मोबाइल बंद असताना पोलिसांनी त्याच्या बँक अकाउंटची माहिती काढून तपास करून पीडित मुलीसह त्यास ताब्यात घेतले.

या तरुणीला दि. २४ रोजी तिच्या कॉलेजमधून काहीतरी फूस लावून आमिष दाखवून संशयित मयूर राजेंद्र ताडगे याने पळवून नेले होते. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीचा मोबाइल बंद असल्याचे तपास करणे कठीण होते. सहायक निरीक्षक शंकर मुटेकर यांनी आरोपीच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्याने एका व्यक्तीच्या मदतीने यूपीआयद्वारे पैसे काढल्याचे समोर आले.

पोलिसांना तरुण आणि तरुणी बारामती येथे राहत असल्याचे समोर आले. मुटेकर यांच्यासह महिला पोकॉ. मांडोळे व पोकॉ. पवन पाटील यांच्या पथकाने बारामती येथे जाऊन शोध घेऊन पीडित अल्पवयीन तरुणीसह तिला पळवून नेणारा मयूर ताडगे या दोघांना ताब्यात घेतले.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *