Home » राष्ट्रीय » आ.चव्हाण यांच्या आरोपानंतर पोलिस निरीक्षक पाटील निलंबित !

आ.चव्हाण यांच्या आरोपानंतर पोलिस निरीक्षक पाटील निलंबित !

जळगाव : प्रतिनिधी

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी काढले.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी २९ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केला होता. या प्रकरणात फिर्याद देण्यासाठी आलेली महिला आपण नंतर येऊ असे सांगून परत गेल्याने गुन्हा दाखल होऊ शकला नाही. मात्र या विषयी नैतिकतेला सोडून कृत्य केल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी संदीप पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढले. पाटील यांची अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्यामार्फत खातेअंतर्गत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *