Home » ताज्या » भरधाव वाळूच्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

भरधाव वाळूच्या डंपरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील नेरी दिगर येथे शुक्रवारी गजानन अरुण पाटील (वय ३०) रस्त्याने जात असताना भरधाव वाळूच्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समजताच नेरीसह परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले. शनिवारी दुपारी संतप्त ग्रामस्थांनी जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. डंपर चालकांविरोधात कडक कारवाई करा, वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, नेरी परिसरात दररोज मोठ्या संख्येने वाळू भरलेले डंपर या मार्गावरून भरधाव वेगात धावतात, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही अनेक वेळा पोलिस व महसूल प्रशासनाकडे तक्रारी देण्यात आल्या. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली. आहे. याबात ठोस कारवाईची मागणीही नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार व पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डंपरचा पाठलाग करून चालकास ताब्यात घेतले गेले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आंदोलकांशी संवाद साधून शांतता प्रस्थापित केली आणि रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला. मात्र, ही अपघात मालिका रोखण्यासाठी परिवहन, पोलिस आणि महसूल विभागाने संयुक्त कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *