Home » ताज्या » राहत्या घरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

राहत्या घरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

राहत्या घरात सागर मधूकर चौधरी (वय ३२, रा. श्रीराम चौक) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्रीराम चौकातील शुभमंगल अपार्टमेंटमध्ये सागर मधूकर चौधरी हे वास्तव्यास होते. दि. ६ रोजी शनिवारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच, त्यांनी लागलीच सागर यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. मयत सागर यांच्या आत्हत्येचे कारण अस्पषट असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ भागवत शिंदे हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *