Home » जळगाव » संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये इको क्लब तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये इको क्लब तर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम

जळगाव : प्रतिनिधी

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालया मधील इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी प.अभ्यास या विषयाअंतर्गत सर्वांसाठी अन्न ‘ या संकल्पनेवर आधारित एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी गणपतीच्या निर्माल्य संकलन करून अर्थात सुकलेल्या व वापरून टाकलेल्या फुलांचा पुनर्वापर करत, त्यांच्यापासून सर्जनशीलतेने फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग त्यांनी कंपोस्ट खत करण्यासाठी केला व एक प्रकारे रोगराईला आळा घालण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे .हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व पर्यावरण संरक्षणाच्या जाणिवेला चालना देणारा ठरला. ही नावीन्यपूर्ण संकल्पना शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांकडून अमलात आणली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *