Home » जळगाव » अमळनेरात दगडफेक : दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अमळनेरात दगडफेक : दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

अमळनेर : प्रतिनिधी

शहरात सोमवारी मिरवणुकीत आरडाओरडा केल्यामुळे दोन्ही गटांतर्फे एकमेकांवर दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटातील दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस मध्यस्थी करायला धावले असता पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली गेली. सुदैवाने यात कोणीही जखम झाले नाही.

गोपनीय शाखेचे अंमलदार सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिली की, ८ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता गांधलीपुरा पोलिस चौकीसमोरून मिरवणूक जात असताना चौकीसमोर सात ते आठ जण आरडाओरड करत होते. म्हणून ८ ते दहा साथीदारांनी आरडाओरड करणाऱ्यांच्या दिशेने जाऊन दगडफेक केली. त्याला प्रतिहल्ला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी यांच्या दिशेने दगडफेक केली. हे पाहून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलिस उपनिरीक्षक शरद काकळीज, उपनिरीक्षक समाधान गायकवाड, मिलिंद बोरसे, अशोक साळुंखे हे दोन्ही जमावाच्या दिशेने धावले असत्ता त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक केली. त्यात पोलिसांनाही दगड लागले. याबाबत ९ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *