Home » जळगाव » भरधाव रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव रेल्वेच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

कामावर जात असल्याचे गेलेला सांगून आकाश सुरेश सपकाळे (वय २६, रा. प्रजापत नगर) याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. दोन दिवसांपासून तो घरी न परतल्याने पोलिस ठाण्यात असलेल्या नोंदीवरून ही घटना उघडकीस आली. एकीकडे मुलाची प्रतीक्षा करत असताना थेट त्याच्या मृत्यूची वार्ताच घरी आल्याने सपकाळे कुटुंबीयास जबर धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते भादली दरम्यान असलेल्या अपलाईनवर १३ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या धडकेत अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अनोळखी म्हणून नोंद होती. १५ सप्टेंबर रोजी आकाश सपकाळे हे बेपत्ता असल्याची तालुका पोलिस ठाण्यामध्ये नोंद असल्याची माहिती तपास अधिकारी प्रदीप नन्नवरे यांना मिळाली.

नन्नवरे यांनी सपकाळे कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बोलावले. त्याठिकाणी मयताच्या अंगावरील शर्ट व त्यांच्या हातावर गोंदलेल्या ‘आई’ शब्दावरून आकाशचे काका व भावाने ओळख पटवली. आकाश सपकाळे हा १३ रोजी एमआयडीसीमध्ये कामावर जातो असे आईला सांगून गेला होता. मात्र रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *