Home » राष्ट्रीय » गुजरातमधील अट्टल गुन्हेगार भुसावळ येथे अटक : स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई !

गुजरातमधील अट्टल गुन्हेगार भुसावळ येथे अटक : स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई !

भुसावळ :  प्रतिनिधी

गुजरात राज्यातील विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉंटेड असलेला व जबरी चोरीप्रकरणी फरार असलेला आरोपी साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा.भाटीया गाव,हाजीपुरा,सचीन,जि. सुरत) याला जळगाव जिल्ह्यात अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. साहील पठान हा तापी,व्यारा येथील सेशन कोर्टातील केस क्र. ४२/२०२४ मधील फरार आरोपी होता. त्याच्यावर भा.दं.वि. कलम ३९४, ३९७, ३४२, ३२३, ५०४(२), ३४, १२० (ब), तसेच आर्म अ‍ॅक्ट कलम २५(१) आणि जी.पी. अ‍ॅक्ट १३५ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आज दि. १९ सप्टेंबर रोजी निझर पोलीस स्टेशन, सुरत (गुजरात) येथून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जळगाव जिल्ह्यात आल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ उपविभागातील स्थागुशा पथकाने सापळा रचून भुसावळ शहरातील नहाटा चौफुली हायवे परिसरातून आरोपीस अटक केली.

आरोपीवर यापूर्वी दाखल असलेले गुन्हे गुजरातमधील विविध पोलीस ठाण्यांत खालील गुन्हे दाखल आहेत – उमरा,सचिन,माहीरापुरा,पुना,कडोदरा आणि नवसारी या विविध पोलिस स्टेशमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे . अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास निझर पोलीस स्टेशन, सुरत येथील सफौ ए.बी.पटेल यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पुढील कायदेशीर कार्यवाही सुरत पोलीसकडून करण्यात येणार आहे. ही कारवाईपोलीस अधीक्षक डॉ.माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड,पो.उप.नि.शरद बागल,पो.उ.नि. रवि नरवाडे,पोहेकॉ गोपाल गव्हाळे,उमाकांत पाटील,विकास सातदिवे,प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *