Home » महाराष्ट्र » नव्या वादाला फुटले तोंड : शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !

नव्या वादाला फुटले तोंड : शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना राजकीय स्तर घसरल्याचं दिसत आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना किमान शब्दांचे भान वापरले गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत नाही. दिवसेंदिवस एकमेकांवर टीका करताना भाषेचा स्तर घसरत चाललेला आहे.

नुकतचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना अत्यंत खालचे शब्द वापरले होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदेंच्या एका खासदाराने उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना भाषिक पातळी ओलांडली आहे.

उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी शिवेसेना शिंदे गटाकडून आनंद दिघे यांचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावत असलेल्या फोटोवर विधान केलं होतं. या कारणामुळे दोन्ही शिवेसेंमध्ये जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के हे खासदार संजय राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. नुकतचं त्यांनी राऊतांवर टीका करताना संजय राऊत यांची पात्रता ही राहुल गांधींनी पाळलेला डाॅगची असल्याचं म्हटलं आहे. यामुळे केलेल्या विधानामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *