September 22, 2026 11:28 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » एकाच रात्री अनुराग स्टेट बैंक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरी !

एकाच रात्री अनुराग स्टेट बैंक कॉलनीत दोन फ्लॅटमध्ये चोरी !

जळगाव : प्रतिनिधी

अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरांमधून सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण सहा लाख ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घरफोडी १९ सप्टेंबर रोजी अनुराग स्टेट बैंक कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग स्टेट बैंक कॉलनीतील ब्रीज हाइट्स अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहणारे दीपक परदेशी हे खासगी वकिलाकडे नोकरी करतात. ते ७ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांसह सुरत येथे गेले होते, तसेच तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिनेश बाबूराव गोडंबे सप्टेंबर रोजी फत्तेपूर येथे गेले होते. १० दोन्हीही फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप, सेंट्रल लॉक तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले.

चोरट्यांनी परदेशी यांच्या घरातील कपाटामधील रोख ४० हजार रुपयांसह २२ तोळे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, ३२५ ग्रॅम चांदीचे दागिने, असा एकूण तीन लाख ९३ हजार ५० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला, तसेच गोडंबे यांच्या घरातील कपाटामधून १६ तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. घटनास्थळी रामानंदनगर पोलिसांसह श्वान पथक व फॉरेन्सिकचे पथक दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाहून ठसे गोळा केले. चोरी झाली त्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!