Home » जळगाव » अखेर ‘त्या’ डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल !

अखेर ‘त्या’ डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी

वाळूच्या डंपरने कारला धडक दिल्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याने डंपर चालक दीपक दगडू ठाकूर (२६, रा. डांभुर्णी, ता. यावल) याला अटक केली आहे. जखमी बापलेकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीचे दर्शन करून जळगावकडे येणाऱ्या चौधरी कुटुंबाच्या कारला डंपरने धडक दिली होती. त्यामुळे कार विदगाव पुलावरून खाली कोसळून मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ नीलेश चौधरी (१२) यांचा मृत्यू झाला. तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व लहान मुलगा ध्रुव नीलेश चौधरी (वय ४) हे गंभीर जखमी झाले. मयत विवाहितेचे वडील पांडुरंग चौधरी (रा. संत निवृत्ती नगर) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. डंपर चालक दीपक ठाकूर याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपासात डंपर मालकाचे नाव निष्पन्न केले जाईल, असे सपोनि अनंत अहिरे यांनी सांगितले.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *