Home » महाराष्ट्र » गौतमी पाटीलसाठी मंत्री पाटलांचा थेट डीसीपींना फोन !

गौतमी पाटीलसाठी मंत्री पाटलांचा थेट डीसीपींना फोन !

पुणे : वृत्तसंस्था

गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत येत असते मात्र आता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात ३० सप्टेंबरच्या दिवशी एका रिक्षाला पाठीमागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यामुळे या प्रकरणात सतत चर्चेत असते. मात्र, ती यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या अपघातात रिक्षातील चालक आणि इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे. सामाजी मरगळे असं या अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे. या अपघाताच्या घटनेत चारचाकी वाहनातील चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान गतीने फिरवली आहेत.

मंत्री चंदक्रांत पाटील यांचा डीसीपींना फोन

पोलिसांनी गौतमी पाटील हिला नोटीस पाठवली असून तिला हजर राहण्यास सांगितलं आहे. तिला पाठवण्यात आलेल्या नोटीसमुळे गौतमीला अटक होणार? अशा बातम्या समोर येत आहेत. पण तिला पोलिसांनी नोटीस का पाठवली आणि या सगळ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावून गाैतमी पाटीलला उचलायचे की नाही? असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे.

सगळ्यात महत्वाच म्हणजे गौतमीला पोलिसांनी नोटीस पाठवली याचं कारण ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली. ते वाहन गौतमी पाटील हिच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणात रिक्षाचालकाच्या नातेवाईकांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले आहेत. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये उपस्थित होती, असा गंभीर आरोप रिक्षालाचकांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *