Home » राष्ट्रीय » राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त! तीन टप्प्यात मतदानाची शक्यता

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मुहूर्त! तीन टप्प्यात मतदानाची शक्यता

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीनंतर निवडणुका लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल याविषयी संभाव्य अपडेट समोर आली आहे. या निवडणुकात तीन टप्प्यांत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका अनुक्रमे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत होणार असल्याची माहिती आहे. सोमवारी राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. आता पुढील काही दिवसांमध्ये मनपा निवडणुकीची मोठी अपडेट येऊ शकते. त्यानुसार मनपा महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे महापालिका क्षेत्रातील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

संभाव्य तीन टप्प्यात अशा निवडणुका होऊ शकतात.

महाराष्ट्रात नगपरिषदेच्या निवडणुका 15 ते 20 नोव्हेंबर दम्यान होण्याची शक्यता
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका 15 ते 20 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
महानगरपालिकेच्या निवडणुका या पुढील वर्षात 15 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.
सर्व महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेला वेग प्राप्त होणार

राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 33 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद अनुसूचित जाती, 11 नगरपालिकांचं नगराध्यक्षपद अनुसूचित जमाती, तर 67 नगररपालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे नगराध्यक्ष असतील. १३६ नगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गाचे नगराध्यक्ष असणार आहेत. या आरक्षण सोडतनंतर निवडणूक प्रक्रियेतला वेग प्राप्त होणार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *