भुसावळ : प्रतिनिधी
शहराजवळील दीपनगर औष्णिक वीज केंद्र परिसरातील सरगम गेट रोडवर बुधवारी (दि. ८) संध्याकाळी एलपीजी गॅस चालत्या चारचाकी गाडीला अचानक आग लागली. घटना घडल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ आग नियंत्रणात आणली, आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाने फोमचा वापर करून आग विझविण्याचे काम केले. कनिष्ठ अग्निशमन अधिकारी अमृतसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर इंजिन ऑपरेटर शैलेश वाकचौरे, हेमचंद पाटील आणि फायरमन योगेश कचरे, हर्षल नेमाडे, हर्ष काशीकर, सुभाष मेश्राम, प्रतीक भावसार, अतुल कदम यांनी दक्षतेने आणि समन्वयाने आग विझवली. घटनेमुळे काही काळ दिपनगर केंद्र परिसरातील वाहतूक प्रभावित झाली होती, परंतु हवालदार संदीप बडगे यांच्या प्रयत्नांनी वाहतूक लवकर सरळीत झाली.



