Home » जळगाव » महसूल विभागात खळबळ : तलाठी, कोतवाल आणि खाजगी पंटरने घेतली लाच !

महसूल विभागात खळबळ : तलाठी, कोतवाल आणि खाजगी पंटरने घेतली लाच !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यात महसूल आणि पोलीस विभागांतील लाचखोरीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ७३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई आज सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव परिसरातील वाळू व्यवसायाशी संबंधित व्यक्तीकडून ७३ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. या प्रकरणाची तक्रार संबंधिताने जळगाव एसीबीकडे केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. या सापळ्यात वराडसीम येथील तलाठी नितीन पंडितराव केले, कोतवाल आणि एका खाजगी पंटराला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्ह्यात सध्या वाळू वाहतुकीवर बंदी असतानाही, वरिष्ठांच्या आदेशाच्या नावाखाली ही वाहतूक सुरू ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. त्या मोबदल्यात संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात लाच रक्कम मागितली जात होती. ही कारवाई उजेडात आल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *