अमळनेर : प्रतिनिधी
वृद्धाकडील ५० हजार रुपयांची हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन बॅग मुलाला एका तरुणाने झडप घालून पकडले. ही सिनेस्टाईल घटना अमळनेरच्या पैलाड भागात सोमवारी दुपारी एक वाजता घडली. दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पैलाड येथील तुकाराम भोई यांनी सोमवारी दुपारी बडोदा बँकेतून पन्नास हजार रुपये काढले. मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये पैसे ठेवून घराकडे निघाले असता दोन अल्पवयीन मुलांनी एका दुचाकीने त्यांचा पाठलाग सुरू केला. घरानजीक पोहचल्यावर भोई हे दुचाकीच्या डिक्कीमधून पैसे काढत असताना, अल्पवयीन मुलाने त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये हिसकावून पळ काढला. त्यांनी आरडाओरड केली त्यावेळी जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील याने प्रसंगावधन राखत या मुलाला पकडले आणि त्याच्या हातातील पैसे तुकाराम भोई यांना परत केले. हे पाहताच दुसरा मुलगा तिथून पळाला. रोहितने या मुलाला पोकॉ. मंगल भोई व विनोद भोई यांच्या ताब्यात दिले.
Author: K P chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN



