Home » राज्य » छत्रपती संभाजीनगरनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकली : ३ ठार तर १२ जखमी !

छत्रपती संभाजीनगरनजीक ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकली : ३ ठार तर १२ जखमी !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना छत्रपती संभाजी नगर येथील गंगापूर-वैजापूर मार्गावर तांबूलगोटा फाटा येथे बुधवारी मध्यरात्री ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला भाविकांची जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात हैदराबाद येथील ३ जण ठार झाले, तर १२ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (६ महिने), अक्षिता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (वय ५८) अशी मृतांची नावे आहेत. हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे शिर्डीला जात होते. रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे महालगावकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भाविकांच्या जीपने पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चक्काचूर झाला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *