Home » जळगाव » दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

चोपडा : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोपडा ते शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ दुचाकीवरून येणाऱ्या विजय मोरे व अविनाश पाटील या दोघांकडून ३६ हजाराच्या ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विजय देवराम मोरे (वय २८) व धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील अविनाश भिका पाटील (वय २६) हे दोघे दुचाकीवरून शिरपूरकडून चोपडा शहराकडे येत असताना अकुलखेडा गावाजवळ त्यांना थांबवण्यात आले. या वेळी त्यांच्याजवळ ३६ हजार रुपयांचा ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी या दोघांवर चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र चव्हाण, रवींद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चावरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे, विनोद पाटील यांनी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *