Home » जळगाव » भाऊबीज होवून घरी परतत असताना भावाचा दुर्देवी मृत्यू !

भाऊबीज होवून घरी परतत असताना भावाचा दुर्देवी मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी

भाऊबीज निमित्त वरणगावला बहिणीकडून ओवाळणी केल्यानंतर भुसावळला परत येत असताना फुलगाव उड्डाणपुलाखाली झालेल्या भीषण अपघातात साकेगाव येथील वीटभट्टी व्यावसायिक सुनील शंकर कुंभार (वय ४५) मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी २३ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील कुंभार हे आपल्या मोटारसायकलने (एमएच १९ ईई ५७७३) फुलगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलने भरधाव वेगात सुनील यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. या धडकेत सुनील गंभीर जखमी झाले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, वरणगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी सुनील कुंभार यांना दाखल होण्यापूर्वीच मृत घोषित केले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून विना क्रमांका सुझुकी स्कुटीचा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजते. याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुनील कुंभार यांच्या मृतदेहावर शुक्रवारी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील कुंभार यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन भाऊ मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *