Home » जळगाव » किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला

भुसावळ : प्रतिनिधी

खडका रोड परिसरातील अन्सार उल्लाहनगर येथे किरकोळ वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला झाल्याची घटना २३ रोजी दुपारी घडली. या घटनेत डेअरी चालक शेख जुलकीफ शेख मोहम्मद तलहा (वय २३, रा.अन्सार उल्लाहनगर, भुसावळ) हा जखमी झाला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जुलकीफ याचे मोठे काका मोहम्मद अशपाक यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नानंतर शेख जुलकीफ मोटारसायकल घेऊन घरी जात असताना, दुपारी साधारणपणे चारच्या सुमारास गल्लीमध्ये सिराज गवळी, फयाज गवळी व गुड्डू गवळी हे उभे होते. त्यांनी ‘हा गल्लीचा रस्ता आहे, तुझी भंगार मोटारसायकल आवाज करते, तू या रस्त्याने ये-जा करू नकोस,’ असे म्हणत शेख जुलकीफ याला थांबवले. त्यानंतर, तिघांनी त्याला शिवीगाळ केली. तर सिराज गवळी आणि गुड्डू गवळी यांनी मारहाण केली, तर सिराज गवळी याने लोखंडी रॉड आणून शेख जुलकीफच्या मानेवर आणि खांद्यावर प्रहार केला. या घटनेत जुलकीफ याला गंभीर दुखापत झाली. मोहम्मद अशपाक यांनी भांडण सोडवून त्याला जवळील दवाखान्यात नेले. प्राथमिक उपचारानंतर तो पुन्हा डेअरीवर गेला असता, चक्कर आणि उलटी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *