Home » राष्ट्रीय » जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर भूमापन विभागात कर्मचाऱ्यांची दांडी ; कार्यालय पडले ओसाड !

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर भूमापन विभागात कर्मचाऱ्यांची दांडी ; कार्यालय पडले ओसाड !

जळगाव  : प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे सर्व शासकीय कार्यालये बंद होती. मात्र, सुट्टी संपून आज सोमवार हा आठवड्याचा पहिला कार्यदिवस असतानाही अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावलीच नाही. विशेषतः जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर भूमापन अधिकारी कार्यालय आज अक्षरशः रिकामे असल्याचे चित्र दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.२७ रोजी  दुपारी तीन ते चार या वेळेत नगर भूमापन अधिकारी कार्यालयात फक्त एकच कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित असल्याचे दिसून आले. बाकीचे सर्व अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. परिणामी, नकाशे, फेरफार आणि विविध अर्जांशी संबंधित कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सदर कार्यालयात अनेक प्रकरणे प्रलंबित असतानाही कर्मचारी दिवाळीनंतरही गैरहजर राहिल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “सरकारी सुट्ट्या संपल्या, पण कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या संपायच्या नावाने संपत नाहीत,” अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.  या प्रकरणी आता संबंधित वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले कि, आमच्याकडे कर्मचारी कमी असून आज एक कर्मचारी शासकीय कामानिमित्त नाशिक येथे गेले आहे तर बाकीचे  कर्मचारी आज कार्यालयात हजर आहे. अशी माहिती फोन वर अधिकार्यांनी दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *