Home » महाराष्ट्र » एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दहशत माजविणारे तीन अटकेत !

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई : दहशत माजविणारे तीन अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी एक मोठी कारवाई केल्याची बातमी समोर आली आहे. विना परवाना गावठी पिस्तुलसह कोयता घेवून दहशत माजविणारा हद्दपार आरोपी तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचननगर), खुशाल पितांबर सोनार (वय २१) व चेतन पितांबर सोनार (वय २३, दोघ रा. पार्वताबाई ओक नगर) यांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई दि. २५ रोजी रात्री नेहरु नगरात केली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातून हद्दपार असलेला तेजस सोनवणे याच्यासाह खुशाल सोनार व चेतन सोनार हे तिघे शहरातील नेहरु नगरातील संदीपनी बॉईज हॉस्टेजवळ गावठी पिस्तुल व कोयता घेवून दहशत माजवित होते. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यांनी लागलीच नेहरु नगरात धाव घेत संशयित तिघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे गावठी कट्टा व कोयते मिळून आले. त्या तिघांविरुद्ध पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राहूल तायडे हे करीत आहे.

एमआयडीसी पोनि बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, सफौ विजसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों गणेश ठाकरे, पोकों किरण पाटील, पोकों नितीन ठाकुर, पोकों राहुल घेटे, पोकों योगेश घुगे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *