Home » जळगाव » शेतात विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

शेतात विहिरीत पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील दहिगाव येथील शेत शिवारात शेत विहिरीत डोकावत असताना तोल जाऊन तरुण विहिरीत पडला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव ता. यावल या गावाच्या शेत शिवारात छोटू रामकृष्ण महाजन यांच्या शेत आहे. या शेताच्या विहिरीजवळ काशिनाथ हिरामण सोनवणे (वय ३५) हा तरुण गेला होता. विहिरीत डोकावत असतांना त्याचा तोल गेला आणि तो विहिरीत पडला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने त्याला तेथून काढून ग्रामीण रुग्णालय यावल येथे आणले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार सुनील पाटील करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *