November 7, 2026 12:50 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » एमआयडीसी परिसरात गोळीबार : दारू विक्रेत्याकडून दोन कामगारांवर प्राणघातक हल्ला

एमआयडीसी परिसरात गोळीबार : दारू विक्रेत्याकडून दोन कामगारांवर प्राणघातक हल्ला

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरासह परिसरातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे गेल्या काही दिवसापासून समोर येत आहे. आता पुन्हा एकदा शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसी कंपनीच्या बाहेर अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्याकडून कंपनीतील कामगारांवर गोळीबार झाल्याची घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली. यात राजन शेख रफिउल्ला (वय २०) आणि अहेमद फिरोज शेख (वय २६) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एमआयडीसी जी सेक्टर १४ मध्ये ‘विजेता इंडस्ट्रीज’ नावाची कंपनी आहे. या कंपनीतील कामगार सरफू शेख नाईट ड्युटीसाठी कंपनीत जात असताना, कंपनीजवळ असलेल्या एका टपरीवर थांबला. याच ठिकाणी दारु अड्ड्याचा चालक एकाला मारहाण करत होता. सरफू शेख याने हे पाहिले असता, दारु विक्रेत्याने त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीनंतर सरफू शेख याने कंपनीत काम करणाऱ्या आपले दोन्ही भाऊ राजन शेख आणि अहमद फिरोज शेख यांना मदतीसाठी बोलावले. दोघे भाऊ सरफूसह कंपनी बाहेर आले असता, त्या दारु विक्रेत्याने त्यांना देखील शिवीगाळ केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका महिलेने दारु विक्रेत्याला गावठी पिस्तुल दिले. त्या दारु विक्रेत्याने कामगारांच्या दिशेने चार ते पाच राऊंड फायर केले. या गोळीबारामध्ये राजन शेख रफिउल्ला आणि अहमद फिरोज शेख हे दोघे जखमी झाले.

जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!