Home » जळगाव » सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; एरंडोल तालुक्यासह परिसरात खळबळ !

सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; एरंडोल तालुक्यासह परिसरात खळबळ !

जळगाव, दि. ३ : जळगाव जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा गोळीबाराची घटना घडली आहे. एरंडोल तालुक्यातील कढोली गावात झालेल्या या गोळीबारात ३१ वर्षीय तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कढोली गावातील हा तरुण एका खाजगी कंपनीत काम करत असून उद्या पारोळा येथे होणाऱ्या रथोत्सवासाठी तो आई-वडिलांसोबत गावी जाण्याच्या तयारीत होता. आज (दि. ३) दुपारी सुमारास चार वाजताच्या सुमारास तो घराच्या मागील बाजूस उभा असताना अचानक अज्ञात दिशेने गोळी झाडण्यात आली. गोळी थेट छातीत घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. तत्काळ त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणारे आरोपी हे जखमीच्या ओळखीचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला असून नेमका प्रकार काय आहे याचा शोध सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *