जळगाव : प्रतिनिधी
शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने श्रीराम रथोत्सवाच्या कार्यक्रमात महिलांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या अट्टल महिला गुन्हेगारांना अटक करून त्यांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ नोव्हेंबरला दाणाबाजार परिसरातील अन्नदाता हनुमान मंदिराच्या जवळ रथ आल्याने दर्शनासाठी महिला व पुरुषांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान याच गर्दीचा फायदा घेत काही महिला आरोपींनी दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील सुमारे ७७ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या मंगळसूत्रातील वाट्या व मणी तोडून चोरी केली होती. चोरीची तक्रार जळगाव शहर पोलिस ठाण्याला दाखल झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे व पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक फौजदार सुनील पाटील, पोहेकॉ नंदलाल पाटील, पोहेकॉ वीरेंद्र शिंदे आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांसह हर्षदा सोनवणे, जयश्री मराठे, मोनाली राजपूत यांचे दोन पथक दाणाबाजार परिसरात रवाना झाले. पथकाने संशयित महिलांना ताब्यात घेतले.



