Home » जळगाव » बापरे : आता चोरट्यांची धाव मंदिराकडे : भरदिवसा विठ्ठलाच्या मंदिरात चोरी !

बापरे : आता चोरट्यांची धाव मंदिराकडे : भरदिवसा विठ्ठलाच्या मंदिरात चोरी !

चोपडा : प्रतिनिधी

तालुक्यातील बिडगाव येथील विठ्ठल मंदिरातील वापरात असलेला ११ किलो वजनाची पितळेची घंटा भरदिवसा चोरून नेली, तसेच दानपेटीही पळवण्याचा प्रयत्न झाला. याबाबत – ग्रामस्थांनी अडावद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, बिडगाव येथे वरगव्हाण रस्त्यावर विठ्ठल मंदिर बांधले असून गेल्या वर्षी येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. याच वेळेस येथे ११ किलो पितळ धातूची घंटा बसवण्यात आली आहे. हीच घंटा गावात गुरुवारी भरदिवसा दुपारच्या वेळेस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. तसेच दानपेटी ही जागेवरून हलवत पळवून नेण्याचा प्रयत्न झाला.

संतप्त ग्रामस्थांनी सायंकाळी पो.पा. रामकृष्ण पाटील यांच्यासह अडावद पोलिस स्टेशनला जाऊन येथील स. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांना घटनेची सविस्तर माहिती देत तक्रार दिली आहे. त्यानंतरही शुक्रवारीदेखील अडावद पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *