Home » जळगाव » नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई : अवैध देहव्यापार अड्ड्यावर छापा !

नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई : अवैध देहव्यापार अड्ड्यावर छापा !

जळगाव : प्रतिनिधी

नशिराबाद-जळगाव महामार्गालगत टीव्ही टॉवरसमोरील मन्यारखेडा शिवारातील एका पक्क्या सिमेंट काँक्रीटच्या घरात सुरू असलेल्या अवैध देहव्यापाराच्या अड्ड्यावर नशिराबाद पोलिसांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेतले असून, दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, या ठिकाणी काही महिला व मुलींना डांबून ठेवून जबरदस्तीने देहव्यापार करवून घेतला जात असल्याचे समोर आले. नशिराबाद पोलिसांनी जळगाव मानवी तस्करी विरोधी पथकाच्या (AHTU) मदतीने कारवाईची योजना आखली. छाप्यादरम्यान घरातून पाच तरुणी व दोन चालक आढळून आले. घटनास्थळावरून सुमारे ६३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी राहुल कडू पाटील (रा. रायपूर फाटा, जळगाव) आणि राम विश्वास बोरसे (रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, चेतन माळी व श्याम विश्वास बोरसे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र तायडे, सहायक फौजदार संजय महाजन, हवालदार शरद भालेराव, चंद्रकांत पाटील, गणेश गायकवाड, सागर भिडे, मोनाली दहीभाते, युगंधरा नारखेडे, भूषण पाटील, युनूस शेख, ज्ञानेश्वर पवार तसेच AHTU पथकाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *