चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात २६ वर्षीय विवाहितेकडे पाहून अश्लिल हावभाव करणाऱ्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित विनोद बापू पाटील याने विवाहितेकडे पाहून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

याकडे विवाहितेने दुर्लक्ष केले. तर दोन दिवसानंतर त्याने त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर काही दिवसांनी तसेच कृत्य संशयिताने केले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


