Home » जळगाव » २८ वर्गषीय तरुणाने संपविले आयुष्य !

२८ वर्गषीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील पळसोद येथील सुनिल भगवान सोनवणे (वय २८) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पळसोद येथे सुनिल सोनवणे हा तरुण वास्तव्यास आहे. गुरुवार दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास सुनिल याने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच सुनिल सोनवणे याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. सुनिल याने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *