Home » जळगाव » धक्कादायक : मेहरुण तलावात बुडून एकाच दुर्देवी मृत्यू !

धक्कादायक : मेहरुण तलावात बुडून एकाच दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील मेहरुण तलावात बुडून प्रकाश राजकमल कांबळे (वय ४८, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनीत प्रकाश कांबळे हे वास्तव्यास असून ते मजूरी काम करतात. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्रकाश कांबळे यांचा मृतदेह मेहरुण तलावात मिळून आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यलाय व रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *