Home » जळगाव » तरुणीने दिली तरुणासाठी पालकांना आयुष्य संपविण्याची धमकी

तरुणीने दिली तरुणासाठी पालकांना आयुष्य संपविण्याची धमकी

बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातील सोळा वर्ष पूर्ण झालेली अल्पवयीन तरुणी गत आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. काही दिवसांनी ती परत गावात आली, परंतु तिने आपल्या पालकांसमोर तरुणाविरुद्धची तक्रार मागे घेण्यास दबाव आणला आणि आत्महत्येची धमकी दिली. एकदा तिने प्रयत्न देखील केला.

यामुळे पालक घाबरून बोदवड पोलिस ठाण्यात पोहोचले. पो. नि. अरविंद भोळे यांनी दीड तास मुलीला समुपदेशन केले; परंतु तिला काही फरक पडला नाही. पोलिस निरीक्षकांनी परिस्थिती गंभीर असल्याने तिला शांत वातावरणात घेऊन जाण्याचे सुचवले. पालकांनी तिला समजावून सांगितले की, लग्नासाठी दुसरा चांगला मुलगा निवडू शकतेस.” मात्र मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. यामुळे भोळे यांनी त्या मुलीला कोठेतरी फिरायला घेऊन जा, असे सांगत तिची मनस्थिती बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *