Home » राष्ट्रीय » शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयावर वादाचा भडका; मनपाकडे कारवाईची मागणी

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयावर वादाचा भडका; मनपाकडे कारवाईची मागणी

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल भवन ( लेवा भवन ) या ठिकाणी चक्क सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे कार्यालय उघडण्यात आले असून हे कार्यालय चे सर्वेसर्वा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी उघडले असल्याचे म्हटले आहे. याबाबत भंगाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट/REEL देखील टाकलेली आहे. विष्णू भंगाळे हे सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. तसेच पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे देखील निकटवर्ती आहे.

या पोस्ट व्हिडिओचा आधार घेत जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्व.नरेंद्रअण्णा पाटील यांचे चिरंजीव ॲड.पियुष नरेंद्र पाटील यांनी थेट आयुक्तांकडे लेखी तक्रार केलेली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की : सरदार वल्लभ भाई पटेल भवन ( लेवा भवन ) ही जागा जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीची असून सदर जागा संबंधित संस्थेला करारावर देण्यात आलेली आहे.सदर संस्था ही जागा देत असताना यामध्ये कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे कार्यालय करता येणार नाही किंवा वापरता येणार नाही म्हणून म्हटलेले आहे.परंतु याचे सर्रास उल्लंघन झालेले असल्याने सदर अनाधिकृत कार्यालय हे जळगाव शहर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तात्काळ जप्त करावे म्हणून तक्रार अर्ज दिलेला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *