November 9, 2026 7:36 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » सोनं थांबलं, पण चांदी धावली : भाववाढीचा सलग तिसरा दिवस !

सोनं थांबलं, पण चांदी धावली : भाववाढीचा सलग तिसरा दिवस !

जळगाव : प्रतिनिधी

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीच्या लाटेत चांदीचे दर बुधवारी आणखी तेजीत गेले. चांदीत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ नोंदवत ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात मात्र ५०० रुपयांची घसरण झाली असून, ते एक लाख २३ हजार ८०० रुपये प्रति तोळा इतके झाले आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीनंतर १० नोव्हेंबरपासून पुन्हा भाववाढीची लाट दिसू लागली. फक्त दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल चार हजार रुपयांची वाढ होऊन ११ नोव्हेंबर रोजी ते एक लाख २४ हजार ३०० रुपयांवर गेले होते. मात्र, मंगळवारी (१२ नोव्हेंबर) दर पुन्हा घसरले.

दरम्यान, चांदी मात्र सतत तेजीत आहे. १० व ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत चांदीच्या दरात सात हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर बुधवारी पुन्हा दोन हजार रुपयांची उसळी घेत चांदी एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यामुळे फक्त तीन दिवसांत चांदीत तब्बल ९,५०० रुपयांची वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी या कारणांमुळे चांदीच्या दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!