September 24, 2026 10:34 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » चाळीसगाव » अश्लील हावभाव करणाऱ्या चार महिलांवर पोलिसांची कारवाई !

अश्लील हावभाव करणाऱ्या चार महिलांवर पोलिसांची कारवाई !

चाळीसगाव : प्रतिनिधी

गुजरी पुलाजवळील भाजीपाला मार्केट परिसरात रस्त्याच्या कडेला उभे राहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव व इशारे करणाऱ्या चार महिलांवर चाळीसगाव शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी सुमारे २.५५ वाजता कारवाई केली. या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून या पावलाचे स्वागत होत आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना, संबंधित ठिकाणी काही महिला अश्लील हावभाव करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पथक तयार करून संबंधित महिलांवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल मांडोळे, अनिता सुरवाडे, सबा शेख, महिला पोलीस नाईक मालती बच्छाव, हवालदार विनोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर पाटोळे व कल्पेश पगारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान चार महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून नागरिकांना अश्लील हावभाव व इशारे करत असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलीस कॉन्स्टेबल सबा शेख यांच्या फिर्यादीवरून संबंधित महिलांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हवालदार दत्तात्रय महाजन करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!