Home » जळगाव » धक्कादायक : विषारी सापाने घेतला वृद्ध महिलेचा जीव !

धक्कादायक : विषारी सापाने घेतला वृद्ध महिलेचा जीव !

जळगाव : प्रतिनिधी

विषारी साप चावल्यामुळे उपचार सुरु असलेल्या अनिता शांताराम पाटील (वय ६०, रा. नांद्रा बु. ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील नांद्रा बु. येथे अनिता पाटील या वृद्ध महिला वास्तव्यास होत्या. घरी असतांना त्यांना साप चावला, त्यांनी ही घटना कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी वृद्ध महिलेला तात्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना अनिता पाटील या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी सीएमओ डॉ. अनिता मोमीन यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *