November 12, 2026 9:30 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली तहसीलदारांसह प्रांतधिकारी यांना शोकॉज

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली तहसीलदारांसह प्रांतधिकारी यांना शोकॉज

जळगाव : प्रतिनिधी

गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशा व साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने दि. १४ नोव्हेंबर रोजी धडक कारवाई केली. यात खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी, कांताई बंधारा परिसरात प्रशासनाने धाड टाकत मोठ्या वाळू साठा जप्त केला. त्यांच्या पंचनामा करण्यात आला असून, तो साठा २३०० ब्रास आला आहे. याप्रकरणात धानोऱ्यांचे पोलिस पाटील, तलाठी व सर्कल यांना निलंबीत करण्यात आले असून, जळगाव तहसीलदार शीतल राजपूत व प्रांतधिकारी विनय गोसावी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अवैध वाळू साठ्यावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या पथकाने कारवाई केली होती. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वाळू उपशाच्या तक्रारी, नदीपात्राचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन ही मोहिम राबवण्यात आली. अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अचानक कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या संपूर्ण वाळू साठ्याचा पंचनामा गौण खनिज विभागाने केला आहे. साठा विखुरलेल्या प्रमाणात असल्यामुळे उशिर लागला. जप्त केलेली वाळू २३०० ब्रास असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सध्या हा अवैध साठा पोलिस बंदोबस्तात गिरणा काठावर असून, त्या साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी कारवाया होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!