Home » जळगाव » चाळीसगाव » ट्रकमधून ६१ सिलेंडरची चोरी : एमआयडीसी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात !

ट्रकमधून ६१ सिलेंडरची चोरी : एमआयडीसी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातून ६१ नग गॅस सिलेंडर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात चोरी करणारे दोन आरोपी त्यांच्या गुन्ह्यात वापरलेल्या आयशर वाहनासह जेरबंद करण्यात आले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी भारत पेट्रोलियम जळगाव येथून रिफिलिंग केलेले ३४२ नग सिलेंडर एका ट्रक वाहनामध्ये भरून एमआयडीसी परिसरात पार्किंग केले होते. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी सदर वाहन जागेवर दिसले नाही. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या या वाहनातून ६१ नग सिलेंडरची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय माहिती मिळवत आरोपींची ओळख पटवली.

१८ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांनी जळगाव शहरातील एमआयडीसी भागात सापळा रचून शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद) या आरोपीस ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आपला साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ६१ नग गॅस सिलेंडर हस्तगत केले. तसेच, गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन देखील जप्त केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *