यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील साकळी गावातील गोदामातून पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरुन कारवाई करत १ लाख ६५ हजार ९७६ रुपयांचा गुटखा जप्त करुन शनिवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील भोनक नदीच्या काठावर चिंटू वाणी याच्या गोदामामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पो.नि. प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौरदार अस्लम खान, सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस नाईक मोहसीन खान, अनिल साळुंखे, अरशद गवळी, मुकेश पाटील, राजेंद्र पाटील या पथकाला त्यांनी कारवाईसाठी पाठवले. त्याठिकाणी छापा टाकला असता या गोदामातून प्रतिबंधित १ लाख ६५ हजार ९७६ रूपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हवालदार योगेश गोसावी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



