Home » जळगाव » टीईटी परीक्षेपूर्वी शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; प्रवेशद्वारासमोरच कोसळले पाचोऱ्याचे शिक्षक !

टीईटी परीक्षेपूर्वी शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू; प्रवेशद्वारासमोरच कोसळले पाचोऱ्याचे शिक्षक !

जळगाव : प्रतिनिधी 

राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयासमोर घडली. संदीप प्रल्हाद पवार (वय ४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पवार कार्यरत होते. ते दुचाकीने जळगावातील परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. आत जाण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयासमोरच्या दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी थांबले असता अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पवार यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने शिक्षकवर्गावर शोककळा पसरली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *