जळगाव : प्रतिनिधी
पत्नी यात्रोत्सवात गेलेली असताना घरी एकटेच असलेल्या प्रभाकर हिंमत धनगर (४२, रा. नंदगाव, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील प्रभाकर धनगर हे कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे यात्रेत गेल्या होत्या. त्यामुळे धनगर हे घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. तपास पोहेकॉ. दीपक चौधरी करीत आहेत.



